उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे.
...