⚡तिसऱ्या टी-20 मध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा 9 विकेट्सने केला पराभव
By Nitin Kurhe
तिसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 9 विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला विजय मिळवला. पाकिस्तानचा सलामीवीर हसन नवाजने 45 चेंडूत नाबाद 105 धावा करत संघाला 16 षटकांत 207 धावांचे लक्ष्य गाठून दिले.