तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 101.4 षटकांत 453 धावांवर आटोपला. यासह यजमान संघाने इंग्लंडला 658 धावांचे लक्ष्य दिले. केन विल्यमसनने किवी संघासाठी दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 33वे शतक झळकावले. विल्यमसनने 204 चेंडूत 156 धावांची खेळी केली. ज्यात 20 चौकार आणि 1 षटकार मारला होता.
...