कधीकधी एखादा विशिष्ट खेळाडू एखाद्या संघात सामील होतो तेव्हा त्या संघाचे भाग्य बदलते. इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये यंदा व्यंकटेश अय्यर आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये असाच एक योगायोग पाहायला मिळाला. आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत केकेआर संघ 7 सामन्यांमध्ये दोन विजय यासह सातव्या स्थानावर होता आणि प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण दिसत होते, पण अय्यरला संधी मिळताच संघाचे भाग्य बदलले.
...