भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नॉटिंगहम येथे सुरू होणार आहे. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांना पराभूत करणे सोपे होणार नाही. हिरव्या खेळपट्ट्यांवर चेंडू उसळतो आणि वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ब्रिटिश संघात पहिला दोन सामन्यांसाठी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.
...