आरसीबीने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे पण जर त्यांना टॉप 2 मध्ये राहायचे असेल तर या सामन्यात विजय आवश्यक आहे. हैदराबाद आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, त्यांना सन्मानजनक विजयासह स्पर्धेतून बाहेर पडायचे आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करताना हैदराबादने बंगळुरुसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...