आशिया चषकासाठी भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ 19 जुलै रोजी शेजारील देश पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
...