गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करुन विजयाची नोंद केली आहे. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याआधी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने मुंबईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 6 गडी गमावून 160 धावा करु शकला.
...