हनोईमध्ये वाढदिवस साजरा करत असतांना एका महिलेच्या हातात हायड्रोजन बलूनचा स्फोट झाला. हि घटना 14 फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे . जियांग फाम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही घटना रेस्टॉरंटमध्ये घडली. जियांगने हायड्रोजन बलून विकत घेतले होते आणि स्टेजवर केकसोबत फोटो काढण्यात मग्न असतांना फुग्याचा स्फोट झाला. हायड्रोजन-भरलेले फुगे, जे सामान्यत: हवेपेक्षा हलके असतात म्हणून वापरले जातात, अत्यंत ज्वलनशील असू शकतात
...