तेलंगणा उच्च न्यायालयात कोर्टरूममध्ये मंगळवारी युक्तिवाद करताना एका वकिलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव वेणुगोपाल राव (66 वर्ष) आहे.राव दुपारी 1.20 च्या सुमारास न्यायमूर्ती लक्ष्मी नारायणा अलीशेट्टी यांच्यासमोर कोर्ट हॉल 21 मध्ये सबमिशन देत असताना त्यांना अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले.
...