आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने नुकताच मुंबईत आपला २३ वा वाढदिवस साजरा केला असून या पार्टीतील एका फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत झनाई दिसत असलेल्या या फोटोमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. हसत-हसत सिराजकडे झनाईने पाहिलेली नजर सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत असल्याने चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधले आहेत.
...