इन्स्टाग्रामवर राणी कुमारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या तसेच मुलींसारखी वेशभूषा करून व्हिडीओ बनवणारा बिहारचा प्रसिद्ध युट्यूबर अंकित कुमार याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. युट्यूबर आणि रिल स्टार अंकितने आईसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, रिल्ससाठी मुलीचा ड्रेस परिधान करणाऱ्या अंकित कुमारचे हजारो फॉलोअर्स होते.
...