शाळेत असताना डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक किंवा आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आपण सर्वांनी पाहिले होते. पण एका विद्यार्थीनीने वॉटर म्युझिकसारख्या अनोख्या गोष्टीची पदवी घेतील आहे, याची कल्पना कोणी केली होती का? होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे! नुकताच एका महिलेचा स्टेजवर वॉटर म्युझिक सादर करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने अनेकांचे, विशेषत: विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले, जे या असामान्य पदवीबद्दल ऐकून आश्चर्यचकित झाले. ध्वनी आणि पाणी यांची सांगड घालणारे वॉटर म्युझिक हे अभिनव क्षेत्र आता करिअरचा एक रोमांचक पर्याय बनत आहे.
...