रिलसाठी सध्या तरुण काहीही करतांना दिसून येत आहेत. दरम्यान, बिहारमधील अनुग्रह नारायण रोड स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने एका प्रवाशाला चापट मारल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार रिलसाठी केल्याचे समोर आले आहे. आरोपी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभा होता आणि समोरून गाडी जात असताना त्याने प्रवाश्याला चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
...