पबजी गेम खेळून भारतातील तरुणाच्या प्रेमात पडलेली सीमा हैदर सध्या प्रेग्नेंट आहे. सीमा हैदरचा बेबी शॉवर सोहळा रविवारी पार पडला. सर्वोच्च न्यायालयाचे वकील ए. पी. सिंह यांच्यासह शेकडो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सीमा हैदर गेल्या दोन वर्षांपासून सचिन मीनासोबत रबूपुरा येथे राहत आहे. ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली होती. सीमाला आधीच चार मुले आहेत आणि आता ती सचिनसोबत पाचव्या मुलाची अपेक्षा करत होती. अखेर आनंदाची बातमी समोर आली असून सीमाचा डोहाळ जेवण सोहळा संपन्न झाला आहे.
...