आयएएस टीना दाबीला राजस्थानमधील बारमेर येथे एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण जालपा गावच्या महिला सरपंचाने स्टेजवर इंग्रजीत भाषण केल्याने टीना दाबीसह सगळेच अवाक् झाले. सोनू कंवर असे या महिला सरपंचाचे नाव आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'महिला सरपंचाने घुंगट घेतले आहे आणि पारंपरिक पोशाखात दिसत आहे. महिला सरपंच आपल्या भाषणात म्हणाल्या, 'या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होताना मला खूप आनंद होत आहे.
...