बिहारच्या छपरा जिल्ह्यातील गरखा येथील नारायणपूर गावात एक विवाह समारंभात अचानक नवरदेवाच्या प्रेयसीने एन्ट्री केली. विवाह समारंभात तरुणाची प्रेयसी आली आणि गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत, महिला समारंभादरम्यान गोंधळ करताना दिसत आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाले होते. गोंधळ होऊनही अखेर उपस्थितांनी परिस्थिती शांत केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला नवरदेवाकडे जाते आणि ते विवाहित असल्याचे तिकडे उपस्थित पाहुण्यांना सांगते.
...