भारतात प्रत्येक राज्याचे जेवण संस्कृती ही भिन्न आहे. त्या त्या भागातील अन्नपदार्थ त्या भागाची खासियत आहे. जसे राजस्थान म्हटले की, दाल बाटी चुरमा, गुजरात म्हटले की, फाफडा जलेबी, महाराष्ट्र म्हटले की, भाजी भाकरी... तसेच साउथ इंडिया म्हटलं की, इडली वडा सांबर आठवते. परंतु सांबर ही डिश मराठ्यांची देणगी आहे. आज दक्षिण भारतातला हा पदार्थ लोक आवडीने खातात आणि सांबार ही दक्षिण भारताची ओळख बनली आहे. पण सांभाराची खरी कथा ऐकून आणि तिचा शोध कसा आणि कुठून लागला ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे.
...