पुढे विधानसभा निवडणूक 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये अंतर आले. दोन्ही पक्ष ही निवडणूक वेगवेगळे लढले. त्या वेळीही युतीत अंतर येईल असे काही करु नका असे लालकृष्ण अडवाणी आणि भाजप नेत्यांना सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या होत्या. पण, अखेर युती तुटलीच. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन युती तुटल्याची घोषणा केली.
...