कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एक हृदय जिंकणारा व्हिडिओ समोर आला आहे. जेथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ऑटोचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. दरम्यान, रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेला भरधाव येणाऱ्या ऑटोचा धक्का बसला आणि ती ऑटोच्या चाकात आली. महिलेची मुलगी जवळच्याच शिकवणी केंद्रात शिकत होती, दरम्यान, मुलीने पहिले आणि तिने तत्काळ तेथे पोहोचल्यानंतर शौर्य दाखवत काही लोकांच्या मदतीने ऑटो उचलून आईचे प्राण वाचवले.
...