यूपीच्या कन्नौजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तलग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका न्हाव्यावर मसाज करताना थुंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक कर्मचारी ग्राहकाच्या चेहऱ्याला मसाज करत असल्याचे दिसून येते. यादरम्यान तो दोनदा हातात थुंकतो आणि ग्राहकाच्या तोंडावर घासतो. मसाज करताना डोळे बंद असल्याने ग्राहकाला याबाबत काहीच कळत नाही.
...