अनेकजण कुत्रा-मांजर यांसारखे प्राणी आपल्या घरात पाळतात आणि त्यांच्यावर आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात, तर प्राण्यांमधील मैत्रीचे व्हिडिओही सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. त्यांच्यात प्रेम आणि मैत्रीचे अतूट बंध पाहायला मिळतात, जे लोकांना पाहायलाही आवडते. दरम्यान, सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कुत्र्याचं खेकड्यासोबत बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.
...