मंत्रालयात येणाऱ्या गर्दीत पाणीटंचाईनं ग्रासलेल्या ग्रामीण भागातील लोकांचाही भरणा असतो. पण त्यांना कुठे माहिती आहे. स्वत: मंत्रालयच पाणीटंचाईग्रस्त (Water Shortage in Mantralaya) आहे. होय, अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आहे. अधिवेशन संपून काहीच तास उलटले असतील इतक्यात मंत्रालय आवारात पाण्याची प्रचंड टंचाई असल्याचे पुढे आले आहे.
...