ठाणे जिल्ह्यात (Thane Rains) आज पहाटे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. पहाटे सहाच्या सुमारास मेघगर्जना (Thunder) आणि विजांचा (Lightning ) कडकडाट यांसह पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे पहाटेच्या वेळी फिरायला (Morning Walk) गेलेल्या आणि दिवसपाळीच्या कामासाठी घरातून सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
...