बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक शोषणाच्या घटनेच्या (Badlapur Sexual Assault Case) पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्य सरकारने एक निर्देश जारी करून राज्यातील सर्व शाळांनी त्यांच्या आवारात महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवावेत, असे आदेश दिले आहेत.
...