पुण्यात मेट्रोची लोकप्रिया पाहता प्रशासनही अनेक मार्गांचे नियोजन करत आहे. यातील काही मार्ग पाइपलाइनमध्ये आहेत, तर अन्य मार्गांचे काम सुरू आहे. नियोजित विस्तारांमध्ये पीसीएमसी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, रामवाडी ते वाघोली, चांदणी चौक ते वनाझ आणि खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गांचा समावेश आहे.
...