⚡आता लालपरीचे लोकेशन समजणार! ST महामंडळाने रिअल-टाइम बस ट्रॅकिंग आणि लोकेशन अपडेट्ससाठी लाँच केले अॅप
By Bhakti Aghav
या अॅपमुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर लालपरी बसेसचे स्थान ट्रॅक करता येणार आहे. या अॅपद्वारे, प्रवाशांना त्यांच्या एसटी तिकिटावरील क्रमांकाच्या आधारे त्यांच्या निवडलेल्या बस स्टॉपवर बसची अपेक्षित आगमन वेळ देखील समजणार आहे.