नवी मुंबईत सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी लावला असून या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने बुधवारी वाशी येथील एपीएमसी जवळील एका लॉजवर छापा टाकला, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
...