भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार कुलाबा हवामान केंद्राने कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा किंचित कमी नोंदवले. यापूर्वी डिसेंबरमध्ये मुंबईत इतके उच्च तापमान 5 डिसेंबर 2008 रोजी नोंदवले गेले होते. त्यावेळी मुंबईत 37.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
...