मुंबईत ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क संपूर्ण ठिकाणी पसरलेले दिसत आहे. या जाळ्यात विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुण, तरुणी अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण आणि तरुणी नशेच्या आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई झोनल युनिटने मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने केलेल्या या कारवाईत 11.54 किलो उच्च प्रतीचे कोकेन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हायड्रोपोनिक तण, 5.5 किलो गांजाची गमी (200 पाकिटे) आणि 160,000 रुपये जप्त केले आहेत.
...