अनेक प्रवासी कमी अंतरासाठी रिक्षा पसंत करतात, परंतु याचा फायदा घेत विमानतळाबाहेर अनधिकृत रिक्षाचालक प्रवाशांकडून जास्त पैसे घेतात. प्रीपेड टॅक्सींप्रमाणेच प्रीपेड ऑटो-रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी कीर्तिकर प्रादेशिक परिवहन कार्यालय, अदानी विमानतळ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.
...