मूक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी आज सकाळपासूनच कोल्हापूरात गर्दी वाढताना दिसत होती. सकाळी 8 वाजल्यापासून आंदोलक छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थलाजवळ जमण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनीही या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. राजर्षी शाहू महाराज याच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकर यांनी मूक मोर्चा आंदोलनात सहभाग घेतला.
...