पुण्यातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेची तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. शहरातील येरवडा परिसरातील डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झाला आहे. शुभदा कोडारे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी कृष्णा कनोजा कंपनीच्या लेखा विभागात कामाला होती.
...