पश्चिम उपनगरांमध्ये आजपासून आठवड्याच्या शेवटपर्यंत तापमान 31-33 अंश सेल्सिअस राहील. या आठवड्यात तरी मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही. अहवालानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
...