पालघर येथे छोटा राजन टोळीशी संबंधित आरोपीने स्वतःच्या मुलींवर बलात्कार करून पत्नीवर अत्याचार करणाऱ्या 56 वर्षीय नराधमास पालघर पोलिसांनी अटक केली आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी आरोपीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुरुवारी अटक केली. वरिष्ठ निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी सांगितले की, आरोपीने 2018 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत दोन 16 व 12 वर्षांच्या मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले आणि त्यातील एका मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीला पाच मुली आणि एक मुलगा आहे.
...