पोलिस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पोलिस अधिकारी होण्यासाठी अनेक तरुण अहोरात्र मेहनत करतात. काही जणांचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होते ही परंतु काहींच्या पदरी निराशा येते. मेहनत करूनही केवळ २ गुणांमुळे भरती होऊ न शकल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील बोरफळ गावातून ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नागेश यादव असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय अवघे २३ वर्षे होते.
...