मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र असूनही लाभार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी आलेल्या महिलांची चौकशी होणार आहे. अपात्र महिलांची यादी वगळण्यासाठी लवकरच या यादीची छाननी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी केली. 'लाडकी बहिण योजने'च्या बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यांच्या पडताळणीसाठी प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे.
...