गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द अत्यंत धडाडीची राहिली. आरएसएस स्वयंसेवक ते कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध पदांनुसार आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीतही आले. परंतू, असे असले तरी पुण्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्राचे वेगळेपण कायम ठेवणाऱ्या नेत्यांच्या परंपरेत बापट यांचे नाव आदराने घेतले जाते.
...