जम्मू भागातील उरीजवळ पहाटे 3:00 वाजता हा हल्ला झाला. यावेळी मुरली नाईक तेथे ड्युटीवर होते. यासंदर्भात फ्री प्रेसने वृत्त प्रकाशित केलं आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील काफिदंडा गावातील रहिवासी असलेले मुरली नाईक 2022 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांच्या शहीद होण्याने घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे.
...