उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून भाजप (BJP) सातत्याने देशातील महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोश्यारी यांचे विधान असो किंवा गृहमंत्री अमित शहा यांचे मंगळवारी संसदेत केलेले भाषण असो, भाजप नेते नेहमीच महापुरुषांचा अपमान करत आले आहेत.
...