संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. उसाने भरलेला ट्रक पलटी होऊन कोसळला. या दुर्घटनेत ट्रकखाली 17 मजूर अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने १३ कामगारांचे प्राण वाचले. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
...