⚡वरंधा घाटात 100 फूट खोल दरीत कोसळली कार; एकाचा मृत्यू, 8 जखमी
By Bhakti Aghav
महाडहून भोरला जात असताना पहाटे 4:00 वाजता उंबर्डे गावाजवळ गाडीचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.