महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो बहुतेक पक्ष्यांना होतो. परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कातून भारतीय पशू-पक्ष्यांमध्ये हा प्रादुर्भाव होतो. सध्या होत असलेल्या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण एच१एन५ विषाणूचा स्ट्रेन असल्याचे समोर आले आहे. कोंबड्या आणि पक्ष्यांबरोबरच वाघ आणि बिबट्यांनाही संसर्ग झाला आहे.
...