पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी मुलगा अभ्यास करत नसल्याने वडील त्याला ओरडले होते. घरातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांत भांडण झाले होते. याच भांडणामध्ये आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटले व नंतर त्याचा गळा आवळला.
...