शहरातील सार्वजनिक ठिकाणी दोषी बलात्कारी आणि स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या आसाराम बापूचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहे. आता या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुमित शर्मा नावाच्या एका स्थानिक रहिवाशाने आसाराम बापूच्या या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करून ते वाशी आणि कोपर खैरणेच्या रस्त्यांवर लावल्याचे निदर्शनास आणून दिले.
...