मुंबई विमानतळावर एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या एका कर्मचाऱ्याने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याची चोरीची कल्पना पाहून अधिकारीही हैराण झाले होते. अधिकाऱ्यांनी वैयक्तिक तपासणी केली असता त्याने तीन अंडरवेअर घातलेले आढळले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने प्रवाशांकडून तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेल्याची कबुली दिली.
...