मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी चेंबूरमधील माहुल गावातून 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण येथे बेकायदा वास्तव करून भारतात रहात होते. अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांमध्ये 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले बांग्लादेशी नागरिक गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील चेंबूर येथे बेकायदा वास्तव्यास होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या माहुल गावात बांगलादेशातून आलेले एक कुटुंब गेल्या काही वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती.
...