⚡माथेरान हिल स्टेशन अनिश्चित काळासाठी बंद; पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी घेतला निर्णय
By Prashant Joshi
माथेरानच्या प्रवेशद्वारावर काही घोडे व्यापाऱ्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक होऊ नये म्हणून, माथेरानमधील लोकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु तो अयशस्वी झाल्याने, माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने अखेर माथेरान बंदचे हत्यार उपसले आहे.