शब-ए-बारात हा इस्लामी कॅलेंडरच्या आठव्या महिन्यातील शाबानच्या 14 व्या आणि 15 व्या रात्री दरम्यान साजरा केला जाणारा एक महत्वाचा मुस्लिम सण आहे. प्रत्येक मुस्लिम समुदायासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा सण रमजान सुरु होण्याची पंधरा दिवसापूर्वी येतो. शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लिम बांधव सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात. यंदा शब-ए-बारात चा सण 13 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.
...