प्रेमाचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे संपूर्ण जगभारत साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये साजरा केला जातो. आपण व्हॅलेंटाइन डेबद्दल बोलणार आहोत. एक आठवडा चालणाऱ्या या पश्चिमी साजरीकरणाची सुरुवात रोज डेने होते, हा सुंदर दिवस 7 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवशी तरुण जोडपी प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात, कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही.
...